काळखेडा येथे मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर; ४४५ नागरिकांनी घेतला लाभ
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
जामनेर : काळखेडा, ता. जामनेर, जि. जळगाव येथे आदिवासी पारधी क्रांती संघटना आणि शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने १८ सप्टेंबर २०२६ रोजी मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ४४५ नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला.
या उपक्रमाचे मार्गदर्शन अखिल भारतीय आदिवासी क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुकेश साळुंके यांनी केले. प्रमुख उपस्थिती म्हणून आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा प्रदेश महासचिव दीपक खांदे (सूर्यवंशी) आणि शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, जळगावचे अधिष्ठाता डॉ. संतोष चव्हाण उपस्थित होते.
शिबिराची संकल्पना आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे जळगाव जिल्हा आरोग्यदूत समाधान पवार यांच्या पुढाकारातून साकारली. यावेळी जामनेर तालुका अध्यक्ष मगन पारधी, महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख रविंद्र आढारे आणि जळगाव जिल्हा ज्येष्ठ सल्लागार रमेश साळुंके यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिबिरात विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी करण्यात आली. जनरल तपासणीचा २१२ नागरिकांनी, डोळे तपासणीचा ९१ नागरिकांनी, बालरोग व सुवर्णप्राशनाचा ६२ बालकांनी, तर लॅब तपासणीमध्ये BSL/CBC चा ४० नागरिकांनी लाभ घेतला. तसेच होमिओपॅथिक विभागात ४० रुग्णांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर गरजेनुसार नागरिकांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.
शिबिरात डॉ. राहुल चौधरी, डॉ. निलेश थोरात, डॉ. प्रविण राठोड, डॉ. रेखा जाधव, डॉ. कार्यीकेश्वरी अन्नेवार, डॉ. ऋषिकेश सोनार, डॉ. निखिल पाटील यांच्यासह होमिओपॅथिक विभागातील डॉ. केयुर चौधरी, डॉ. मीना महाजन आणि डॉ. मनोज विसपुते यांनी रुग्णांची तपासणी केली. चेतन तांबोळी, किसन पावरा, विशाल गवळी, मनोज माळी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या आयोजनात सहकार्य केले.
काळखेडा येथील ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांनी शिबिराच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य केले. राहुल शेले, संदिप माळे, कमलेश माळे, जितेंद्र माळे, राजेंद्र शेले, गजानन शेले, पारस शेले, रमेश शेले, विलास माळे, बापू शेले, नंदलाल शेले, विश्वनाथ चव्हाण, शांतीलाल पवार, नामदेव माळे, ईश्वर साळुंके, अरुण माळे, दुर्गादास शेले, राजकुमार माळे, दीपक सोनवणे, ललित साळुंके, विशाल साळुंके यांच्यासह ग्रामस्थांनी सहकार्य केले.
ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच तज्ज्ञांकडून आरोग्य तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे शिबिर उपयुक्त ठरले..
