पेठे विद्यालयात स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात,कृतज्ञ स्मरण व प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न

 पेठे विद्यालयात स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात,कृतज्ञ स्मरण व प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न


महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

नाशिक (प्रतिनिधी ): नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालय, नाशिक येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा व समाजाप्रती असलेल्या योगदानाचा गौरवपूर्वक स्मरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष देवदत्त जोशी होते. यावेळी मुख्याध्यापक गंगाधर बदादे, पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी, सहकार्यवाह शैलेश पाटोळे, कार्यकारी मंडळाचे सदस्य,के.डी.चौधरी,विजय कोठारी व शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात विद्यार्थी प्रतिनिधी श्रेयस जोरेकर व मयुरेश आमले यांनी मनोगत व्यक्त करत स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहिताची जाणीव जोपासण्याचे आवाहन केले. तसेच शिक्षक संदीप शिनकर व रूपाली रोटवदकर यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि समाजसेवेची प्रेरणा दिली.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन विकास खंबाईत यांनी केले, तर भाग्यश्री दीक्षित यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याची प्रेरणा मिळाली असून, त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करून जबाबदार नागरिक बनण्याचा संदेश देण्यात आला.

Previous Post Next Post