माध्यमिक विद्यालय ,उंटवाडी येथे ग्रंथ सप्ताह उदघाटन समारंभ संपन्न
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या उंटवाडी संकुलातील माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे ग्रंथ सप्ताह उदघाटन समारंभ संपन्न झाला .संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न झाला .
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी विद्यार्थी कार्यकारी अभियंता सौरव जोशी व प्रसिद्ध उद्योजक निलेश कोठारी हे उपस्थित होते .विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी , बौद्धिक व सामाजिक विकास व्हावा या उद्देशाने विद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने हा महोत्सव आयोजित करण्यात आला .
प्रमूख अतिथी माजी विद्यार्थी,कार्यकारी अभियंता सौरव जोशी यांनी आपल्या मनोगतातून वाचनाविषयी मार्गदर्शन केले तसेच प्रसिद्ध उद्योजक निलेश कोठारी यांनी ग्रंथ सप्ताहाला शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी शालेय ग्रंथपाल अर्चना देवरे यांच्या सहकार्याने शालेय परिसरात ग्रंथ दिंडी चे आयोजन करण्यात आले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांनी केले पाहुण्यांचा परिचय प्रणाली देशपांडे व संतोष देवांग यांनी करून दिला .शालेय गीत मंचाने स्वागत गीत सादर केले .गीताजयंतीचे औचित्य साधून वेदिका खोडदे,कांचन खेमनर व श्रावणी देशमुख या विद्यार्थिनींनी मृण्मयी घैसास यांच्या मार्गदर्शनाखाली गीतेच्या 15 व्या अध्यायाचे सादरीकरण केले.संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांनी विद्यार्थ्यांना या ग्रंथ महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहित केले .ग्रंथपाल अर्चना देवरे यांनी ग्रंथोत्सवाचे निवेदन केले निवेदनात त्यांनी ग्रंथ सप्ताह काळात घेण्यात येणाऱ्या स्पर्धांविषयी माहिती दिली .शालेय विद्यार्थीनी कांचन खेमनर हिने स्वरचित काव्य सादर सादर केले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन रेखा महिरे यांनी केले. याप्रसंगी आंतरशालेय स्पर्धेमधील पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे यादी वाचन मृण्मयी घैसास यांनी केले. आभार शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर यांनी मानले .
या प्रसंगी संस्था उपाध्यक्ष तसेच शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, मुख्याध्यापक राजेंद्र कापसे, उपमुख्याध्यापक विजय मापारी , पर्यवेक्षक शशिकांत दंडगव्हाळ पर्यवेक्षक सूर्यभान जगताप , शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर ,पालक शिक्षक संघ कार्यावाह प्रवीण जाधव , ज्येष्ठ शिक्षिका सुनंदा कुलकर्णी ज्येष्ठ शिक्षक संतोष देवांग सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते .
