माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुकापूर (वडपाडा) शाळेत क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न..
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
जय योगेश्वर भगवान सामाजिक व शैक्षणिक मंडळ विंचुरे ता.सटाणा जिल्हा नाशिक संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुकापूर वडपाडा या विद्यालयात कला क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. या महोत्सवात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक शरदचंद्र काकुस्ते सर यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी शाळाव्यस्थापन समितीचे अध्यक्ष जयराम भोये,सरपंच श्रीमती.लताताई दळवी, शिक्षणप्रेमी यशवंत दळवी, पोलिस पाटील सखाराम दळवी,आ.का.सोसायटीचे चेअरमन सोनिरामआप्पा गांगुर्डे,ग्रामपंचायत सदस्य जामलेवणी चांगुणाताई गायकवाड, नवनाथ दळवी,संजय दळवी, शिक्षणशास्त्र महाविद्यालय अभोणा येथील प्राध्यापक श्री गावित सर छात्र अध्यापक, व अध्यापिका तसेच पंचकृषीतील पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक संदिप पाटील, सागर देवरे, ज्ञानेश्वर ठाकरे, गजानन दुसाने, नितीन बच्छाव, दिपक कामळस्कर, जितेंद्र पवार, पांडुरंग बागुल, रूपाली बिरारी, संगिता भोये,सुधाकर पवार व रोहिदास गायकवाड* यांनी विशेष परिश्रम घेतले.क्रिडा विभागात क्रिकेट,कबड्डी, खो-खो, धावणे, लांब उडी, बुद्धिबळ आदी स्पर्धा घेण्यात आल्या. तर सांस्कृतिक कार्यक्रमांत विद्यार्थ्यांनी नृत्य, गीतगायन, नाट्यछटा व भाषण सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग व शिस्तबद्ध आयोजन यामुळे संपूर्ण कार्यक्रम यशस्वी ठरला.
*संस्थेचे अध्यक्ष संजयजी गायकवाड व सचिव संगिताताई गायकवाड युवा नेतृत्व श्री तेजस गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाचे कौतुक केले.*
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सागर देवरे व श्री ज्ञानेश्वर ठाकरे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री शरदचंद्र काकुस्ते यांनी केले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना क्रिडा व संस्कृती यांचे शिक्षणातील महत्त्व स्पष्ट केले. विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे ट्रॉफी मेडल प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देणारा ठरल्याचे उपस्थित पालक व ग्रामस्थांनी गौरवोद्गार काढले तर शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री जे के पवार सर यांनी केले.
