खूप खेळा क्रीडा क्षेत्रात यश संपादन करा, शरीर सुदृढ ठेवा - चेतन मोरे(माजी विद्यार्थी)

 खूप खेळा क्रीडा क्षेत्रात यश संपादन करा, शरीर सुदृढ ठेवा -  चेतन मोरे(माजी विद्यार्थी)



महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

   नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक क्रीडा पारितोषिक समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमास चेतन मोरे (माजी विद्यार्थी, एन डी आर एफ ) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.याप्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र कापसे,उपमुख्याध्यापक विजय मापारी, पर्यवेक्षक सूर्यभान जगताप, पर्यवेक्षक शशिकांत दंडगव्हाळ , शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर , पा.शि.संघ कार्यवाह प्रविण जाधव,पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष दिलीप रौंदळ , पालक शिक्षक संघ सचिव सारिका जगताप,शालेय पंतप्रधान रूद्र घरटे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते.

           प्रमुख पाहुणे चेतन मोरे यांनी नियमित खेळा , राज्य , आंतरराष्ट्रीय क्षेत्रात यश संपादन करा .असा मोलाचं सल्ला विद्यार्थ्याना आपल्या मनोगतातून दिला.तसेच आपल्या शालेय आठवणीस उजाळा दिला.

        कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय जेष्ठ शिक्षक दिलीप पवार यांनी करून दिला.निरुपमा ठाकूर , संदीप भगरे, अश्विनी भामरे यांनी पारितोषिक प्राप्त विद्यार्थी यादीचे वाचन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन क्रीडा शिक्षिका मंगला मुसळे यांनी केले तर आभार पर्यवेक्षक शशिकांत दंडगव्हाळ यांनी मानले. संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. रसिका कुलकर्णी , अबोली अकोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय गीतमंचाने स्वागतगीत व क्रीडा गीत सादर केले. तसेच याप्रसंगी क्रीडा महोत्सवा अंतर्गत आयोजित स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. पारितोषीक समितीच्या वतीने मंगला मोरे, मेघा तायडे , केतकी गोविंद,निरुपमा ठाकूर, मृण्मयी घैसास, प्रिया कुलकर्णी,अश्विनी भामरे, चेतन सोनवणे , सुरेंद्र साबळे, यांनी कामकाज पाहिले. क्रीडा शिक्षक मंगला मुसळे, कैलास पाटील, संदीप भगरे यांनी क्रीडा महोत्सवाचे नियोजन केले.

        या क्रीडा महोत्सवात विद्यार्थांनी लंगडी, डॉजबॉल, थ्रो बोल, रनिंग बुद्धिबळ , रोप जम्प या सारख्या विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेतला.

Previous Post Next Post