पेठे विद्यालयाचा दहावी निकाल ९१.१६ टक्के; यशाची परंपरा कायम
(नाशिक) प्रतिनिधी - नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालयाचा शालांत परीक्षा (इयत्ता दहावी) निकाल यावर्षी ९१.१६ टक्के लागला असून विद्यालयाने गुणवत्तापूर्ण निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालय प्रशासनाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्याच्या बळावर हे यश संपादन केल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.विद्यालयाचे मुख्याध्यापक गंगाधर बदादे, उपमुख्याध्यापक साहेबराव राठोड, पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी तसेच सहकार्यवाह शैलेश पाटोळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.शाळेच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये योगदान देणारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक यांचेही यावेळी कौतुक करण्यात आले.दरम्यान, शाळा समिती अध्यक्ष देवदत्त जोशी यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
