निकालात उंटवाडी शाळेचा डंका! ४११ विद्यार्थ्यांची परीक्षेत बाजी, गुणवंतांचा 'सुवर्ण' धमाका!

 निकालात उंटवाडी शाळेचा डंका! ४११ विद्यार्थ्यांची परीक्षेत बाजी, गुणवंतांचा 'सुवर्ण' धमाका!

उंटवाडी माध्यमिक विद्यालयाचा यशाचा झेंडा; १० वीचा निकाल ९९.२७ टक्के!'



महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

नवीन नाशिक: फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या इयत्ता १० वी शालांत परीक्षेत माध्यमिक विद्यालय उंटवाडी या शाळेने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ९९.२७ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेसाठी विद्यालयातून एकूण ४११ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १३० विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी (Distinction) मिळवली, तर १३४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. तसेच ११८ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी आणि २६ विद्यार्थ्यांनी पास श्रेणी मिळवून यश संपादन केले.गुणानुक्रमे पहिले पाच विद्यार्थी खालीलप्रमाणे: १. गौरी परेश सोनार (९५.२०%) - प्रथम. सिद्धीका मच्छिंद्र कोटमे (९४.००%) - द्वितीय ३. सोनल तुषार फेगडे (९२.४०%) - तृतीय ४. रिद्धी नंदकिशोर शिरोडे व प्रितम रवींद्र चित्ते (९२.००%) - चतुर्थ ५. पायल भाऊसाहेब टेकुडे व समृद्धी किरण पाटील (९१.६०%) - पाचवा क्रमांक मागासवर्गीय प्रवर्गातून शांभवी नितीन नेटावटे (९१.००%) हिने विद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, ॲड. जयदीप वैशंपायन आणि कार्यवाह राजेंद्र निकम यांनी अभिनंदन केले. यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र कापसे, उपमुख्याध्यापक विजय मापारी, पर्यवेक्षक सूर्यभान जगताप, शशिकांत दंडगव्हाळ, शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर आणि शिक्षक-पालक संघाच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचा विश्वास यामुळेच शाळेचा निकाल ९९.२७ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन!"— राजेंद्र कापसे, मुख्याध्यापक (माध्यमिक विद्यालय उंटवाडी).
Previous Post Next Post