उंटवाडी सिडको माध्यमिक विद्यालयाचे एन एम एम एस परीक्षेत उल्लेखनीय यश

 उंटवाडी सिडको माध्यमिक विद्यालयाचे एन एम एम एस परीक्षेत उल्लेखनीय यश


महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

    नवीन नाशिक :-नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय, उंटवाडी शाळेस शासनाच्या एन एम एम एस परीक्षेत उत्तम यश मिळाले आहे. 

     या परीक्षेस विद्यालयातून 48 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.त्यापैकी इ 8 वी ची सोनवणे वैभवी नरेंद्र जिल्ह्यात ओबीसी प्रवर्गात १७ वा क्रमांक, गवळी ऋषिका संदीप एस सी प्रवर्गात ५ वा क्रमांक, खरे यश सुधाकर एस सी प्रवर्गात १९ वा क्रमांक, बिन्नर समृद्धी युवराज एन टी प्रवर्गात १५ वा क्रमांक आला . या विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षक हेमंत भुसारे, नितीन धायगुडे, सुमेधा कुलकर्णी , निरुपमा ठाकूर , रसिका कुलकर्णी, अश्विनी भामरे, शीतल मोरे, स्वाती नंदन यांनी मार्गदर्शन केले होते. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, मुख्याध्यापक राजेंद्र कापसे,उपमुख्याध्यापक विजय मापारी,पर्यवेक्षक सूर्यभान जगताप,पर्यवेक्षक शशिकांत दंडगव्हाळ , शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांचे हार्दिक अभिनंदन केले व त्यांना शुभेच्या दिल्या .

Previous Post Next Post