“आदिवासी चळवळीच्या नेतृत्वात दिपक खांदे; महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड”
आदिवासी समाजाच्या न्याय, हक्क व संघटन बळकटीसाठी कार्यरत असलेल्या विविध संघटनांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अखिल भारतीय आदिवासी क्रांती संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी श्री. दिपक बाबुराव खांदे (सूर्यवंशी) यांची निवड करण्यात आली. तसेच आदिवासी पारधी क्रांती संघटनेच्या मालेगाव तालुका उपाध्यक्षपदी श्री. जिभाऊ पवार यांची निवड जाहीर करण्यात आली.
या निवडीमुळे खिर्डी (पा.) ग्रामस्थ तसेच परिसरातील समाजबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजाच्या विविध प्रश्नांवर संघटित पद्धतीने काम करून आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. समाजहित, युवक संघटन, शैक्षणिक व सामाजिक विकास यासाठी पुढील काळात अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
खिर्डी (पा.) ग्रामस्थ, ता. नांदगाव (जि. नाशिक) यांच्या वतीने नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
– प्रतिनिधी
