माध्यमिक विद्यालय उंटवाडी,३९ वा वर्धापन दिन साजरा
नवीन नाशिक:-नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या उंटवाडी संकुलातील माध्यमिक विद्यालय, उंटवाडी शाळेचा 39 वा वर्धापन दिन व इ १० वी शालांत परीक्षेतील यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी प्रसिद्ध उद्योजक गजानन नवले, प्रदिप नवले, अरूण पवार , नामवंत वकील राहुल तिडके, प्रसिद्ध डॉक्टर गिरीश सोनगिरे, डॉ.मेघा निर्मल, डॉ. प्रविण अहिरराव हे उपस्थित होते .याप्रसंगी संस्था कार्यकारिणी सदस्य रंजना परदेशी , मुख्याध्यापक राजेंद्र कापसे , उपमुख्याध्यापक विजय मापारी,पर्यवेक्षक सूर्यभान जगताप, शशिकांत दंडगव्हाळ, शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर,पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष दिलीप रौंदळ, पा.शि.संघ सहसचिव सारिका परदेशी, माजी उपाध्यक्षा पालक शिक्षक संघ किरण अमृतकर , माजी विद्यार्थी,पालक ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांनी केले.सर्व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी विद्यार्थी यांनी आपल्या मनोगतातून शालेय आठवणीस उजाळा दिला . शाळा व संस्थेविषयी ऋण व्यक्त करून विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी नेहमी सहकार्य करू असे आश्वासन दिले. संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यालयाने केलेल्या शैक्षणिक, भौतिक प्रगतीबाबत कौतुक केले व वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळेचे विविध कार्यक्षेत्रात आपल्या कामगिरीचा ठसा उमटवणाऱ्या माजी विद्यार्थी तसेच इ १० वी परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपमुख्याध्यापक विजय मापारी, पर्यवेक्षक शशिकांत दंडगव्हाळ, शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर यांनी करून दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अबोली अकोलकर,बक्षीस पात्र विद्यार्थी यादी वाचन मंगला मोरे,आभार पर्यवेक्षक सूर्यभान जगताप यांनी केले.शालेय गीत मंचाने रसिका कुलकर्णी, यांच्या मार्गदर्शनाखाली स्वागतगीत सादर केले. विद्यालयाच्या वर्धापदिनानिमित्त सर्व शाळा पताका ,रांगोळी, चित्र ,फुगे यांनी सजविण्यात आली होती.प्रवेशद्वाराजवळ कलाश मांडणी ,तसेच प्रत्येक वर्गाची गुढी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आली होती.एन एन सी विद्यार्थ्यांनी पाहुण्याचे स्वागत केले.संस्था अध्यक्ष प्रा. दिलीप फडके ,संस्था कार्यवाह राजेंद्र निकम यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

