मुंबई-आग्रा महामार्गावर वाहतूक तीन तास ठप्प; पावसामुळे वाहनांच्या रांगा

 मुंबई-आग्रा महामार्गावर वाहतूक तीन तास ठप्प;पावसामुळे वाहनांच्या रांगा


(उमेश कुलकर्णी, कार्यकारी संपादक महाराष्ट्र सुवार्ता )

ओझर | प्रतिनिधी :

आज पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओझरकडून नाशिककडे जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गरवारे पॉईंट येथे एक ट्रक अचानक नादुरुस्त झाल्याने परिसरात वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली. रस्त्यावर पाणी साचल्याने तसेच वाहनांची मोठी गर्दी झाल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

वाहतूक कोंडीमुळे नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेक शालेय बस, रुग्णवाहिका तसेच मालवाहू वाहनांनाही या कोंडीचा फटका बसला.

घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस व संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली.

प्रशासनाने नागरिकांना पावसाळ्यात आवश्यक ती खबरदारी घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

Previous Post Next Post