आदिवासी पारधी क्रांती संघटना मालेगाव तालुका कार्यकारिणीचा विस्तार; विविध पदाधिकाऱ्यांची निवड
मालेगाव (प्रतिनिधी): आदिवासी पारधी क्रांती संघटनेच्या मालेगाव तालुका कार्यकारिणी विस्तार बैठकीचे आयोजन शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ रोजी बच्छाव सर्कल, टेहरे फाटा येथे करण्यात आले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुकेश भाऊ साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली बैठकीस प्रदेश महासचिव दिपक खांदे (सूर्यवंशी), सल्लागार शामकांत चव्हाण, सल्लागार संजय साळुंके तसेच मालेगाव तालुका अध्यक्ष रामकृष्ण साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती.जळगाव येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत रामकृष्ण साळुंके यांची तालुका अध्यक्षपदी, स्वप्नील शिसव यांची उपाध्यक्षपदी, विजय साळुंके यांची सचिवपदी आणि जिभाऊ पवार यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. यानंतर झालेल्या विस्तार बैठकीत कार्याध्यक्षपदी संतोष फकिरा चव्हाण, संघटकपदी गणेश दाभाडे व दिलीप चव्हाण, सहसंघटकपदी ज्ञानेश्वर चव्हाण, कोषाध्यक्षपदी बापू चव्हाण यांची निवड करण्यात आली तसेच शालीकराम चव्हाण, शामकांत चव्हाण, कैलास दाभाडे आणि संजय साळुंके यांची सल्लागारपदी, तर सुकदेव पवार, जगन्नाथ माळी, अजय दाभाडे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली.यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा तसेच टोकडे (ता. मालेगाव) ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच शालीकराम साळुंके यांचा सत्कार करण्यात आला.बैठकीत मालेगाव तालुक्यात व्यापक संपर्क अभियान राबविणे, प्रत्येक पारधी कुटुंबापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेणे, आदिवासी विकास विभागाच्या योजनांचा लाभ समाजबांधवांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, अन्याय-अत्याचारग्रस्तांना न्याय मिळवून देणे, आरोग्यविषयक सहकार्य करणे, गावनिहाय कार्यकारिण्या स्थापन करून शाखा फलकांचे अनावरण करणे तसेच पारधी समाज जनजागृती मेळाव्याचे आयोजन करणे आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.बैठकीचा समारोप संघटनेच्या बळकटीकरणाचा आणि समाजहितासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करून करण्यात आला.
