भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी असलमभाई शेख यांची नियुक्ती
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
नाशिक : भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा, नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी असलमभाई शेख यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा अल्पसंख्यांक समाजातील नेते मनसूरभाई मुलाणी यांच्या हस्ते करण्यात आली.
असलमभाई शेख हे सामाजिक, शैक्षणिक व जनसंपर्क क्षेत्रात सक्रिय असून त्यांच्या नियुक्तीमुळे पक्ष संघटन अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी असलमभाई शेख यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचा प्रसार तसेच अल्पसंख्यांक समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार असल्याचे असलमभाई शेख यांनी यावेळी सांगितले.
