नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या उंटवाडी शाळेला माजी विद्यार्थ्याकडून ‘स्मार्ट पॅनल बोर्ड’ भेट
माजी विद्यार्थांकडून इ लर्निंग साठी स्मार्ट पॅनल बोर्ड भेट
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे शाळेचा भौतिक सुविधा च्या उपलब्धतेसाठी माजी विद्यार्थी नेहमीच सहकार्य करत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून सध्याच्या आधुनिक युगातील तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात घेता माजी विद्यार्थी, प्रसिद्ध उद्योजक गजानन नवले यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी इ लर्निग साठी स्मार्ट पॅनल बोर्ड भेट दिला.
या प्रसंगी संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे , संस्था कार्यवाह राजेंद्र निकम,मुख्याध्यापक राजेंद्र कापसे,उपमुख्याध्यापक विजय मापारी, पर्यवेक्षक सूर्यभान जगताप, शशिकांत दंडगव्हाळ, शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
माजी विद्यार्थी गजानन नवले यांनी केलेल्या सहकार्याबद्दल संस्था कार्यवाह राजेंद्र निकम, मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांनी आभार मानले.
