प्राथमिक विद्यालयात नवागतांचे जल्लोषात स्वागत

 प्राथमिक विद्यालयात नवागतांचे जल्लोषात स्वागत

प्राथमिक विद्यालय उंटवाडी शाळेत पहिल्याच दिवशी नवागतांचे अतिशय आनंदी व उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुरेखा बोरसे यांनी गुलाब पुष्प देऊन व औक्षण करून स्वागत केले. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी प्रवेश उत्सवात आनंदाने सहभाग घेतला त्यासाठी विविध खेळांची मांडणी करण्यात आलेली होती. इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले. पाठ्य पाठ्यपुस्तक वितरणाच्या कार्यक्रमासाठी शाळा समिती अध्यक्ष मोंढे सर, माजी शिक्षिका सौ. भामरे , सौ .कोळपकर व सौ.मनीषा आहेर हजर होत्या. विद्यार्थ्यांना त्यांनी नवीन वर्षासाठी शुभेच्छा दिल्या व दररोज शाळेत उपस्थित राहून शालेय शिस्तीचे पालन करावे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ तृप्ती बडगुजर यांनी केले व आभार ज्येष्ठ शिक्षिका सौ . ढोन्नर मॅडम यांनी मांडले. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी सौ.भारती चौधरी ,सौ.घोडेराव श्रीमती.तोरवणे , सौ. गायकवाड, सौ. चौरे इत्यादी शिक्षिका हजर होत्या.
Previous Post Next Post