आदिवासी शक्ति सेना गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
इगतपुरी:-आदिवासी नेते स्व.रमेश भाऊ बांगारे यांच्या वाढदिवसानिमित्त अनुसूचित जाती-जमातीतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेवगेडांग फणसवडी येथे पार पडला. यावेळी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लावण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या सामाजिक उपक्रमासाठी आदिवासी शक्ती सेना इगतपुरी ता युवा अध्यक्ष सोमनाथ रमेशभाऊ बांगारे , संपर्क प्रमुख मुकेश जाधव ,गणेश लहामटे, राहुल जाधव,शांताराम बांगरे,सोमा वारघडे, वैभव लांडगे , रितेश बांगारे यांचे मोलाचे योगदान लाभले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल उपस्थित ग्रामस्थ व पालकांनी आदिवासी शक्ती सेना कार्याचे कौतुक केले.
