२८ वर्षांनंतर पुन्हा भरली शाळा; माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

२८ वर्षांनंतर पुन्हा भरली शाळा; माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात"


महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

ओझर:-येथील नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित नवीन इंग्रजी शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी तब्बल 28 वर्षानंतर शाळा भरवली व स्नेह मेळाव्याचे आयोजन केले. यावेळी विविध आठवणींना उजाळा देण्यात आला. विद्यार्थ्यांनी प्रथम शाळेला भेट देऊन आपण ज्या वर्गात शिकलो त्या वर्गात जाऊन आठवणींना उजाळा दिला यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक शरद शेळके, माजी मुख्याध्यापक बाळासाहेब भडके, यशवंत चौधरी, बाळासाहेब हाडोळे, मंगला भार्गवे, प्रियंका निकम, ज्योती नकोसे, रवींद्र हाते, गंगाधर बदादे, सहकार्य वाह उमेश कुलकर्णी, पुंडलिक शेंडे उपस्थित होते. राजांनी व्यासपीठावरील मान्यवरांनी दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यारंभ केला. 


यावेळी १९९७-९८ सालच्या बॅचच्या वतीने सर्व गुरुजनांचा सन्मान सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपला कौटुंबिक परिचय व आपण कार्यरत असलेल्या क्षेत्राची ओळख करून दिली. आपल्या मनोगतातून माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी सर्वतोपरी मदत व सहकार्य देण्याचे कबूल केले. गुरुजनांनी आपल्या मनोगतातून माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त केला. मेळाव्याच्या दिवशी जागतिक पर्यावरण दिन असल्याने माजी विद्यार्थ्यांनी गुरुजनांच्या हस्ते वृक्षारोपण केले व सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला.हा मेळावा यशस्वी होण्यासाठी किरण कुंदे, सचिन सोनवणे, नेताजी पगार, बंडू साळवे, दिलीप गायकवाड, दीपक बागुल, गिरीश पगारे, संतोष जोंधळे, वसंत शेजवळ, अतिश कासलीवाल, शरद शेजवळ, अरुण चौधरी यांनी विशेष प्रयत्न केले या मेळाव्याप्रसंगी अनेक माजी विद्यार्थी, माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. व हा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष आ कटे याने तर आभार किरण कुंदे यांनी मानले.

Previous Post Next Post