योग निरामय जीवनाचा मार्ग

 योग निरामय जीवनाचा मार्ग



महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

  करूया योग, होऊया निरोग 

 आरोग्याचा धरूया सुंदर मार्ग 

 विविध आसनांचा घेऊया आनंद 

 योगासनांमध्ये दडलाय खरा 

 परमानंद 

 सूर्यनमस्काराने शरीर होई तेजस्वी 

 सूर्य मंत्राने आनंद मिळेल मनस्वी 

 चंद्र नमस्कार उजळवी कांती 

 प्राणायाम देई मनशांती 

वृक्षासनाने वाढते एकाग्रता 

 जीवनामध्ये मिळते नाविन्यता 

 पद्मासनाने वाढे पायांची शक्ती 

 दृढ होई तन आणि भक्तीची वृत्ती 


 शिकूया सर्व आसने सखोल 

 यातून प्राप्त होईल वैचारिक समतोल 

  रोज करूया योग प्रार्थना 

 यातून मिळे आरोग्य साधना 


 योग दिवस फक्त 21 जूनलाच नसतो 

 योग तर प्रत्येक दिवसाचा उत्सव असतो 

 स्वीकारू या आनंदी आणि निरोगी जीवनशैली 

 भरवूया रोज आरोग्यमय योगमैफिली  

                       

            कवयित्री
    श्रीमती प्रतिभा खंडू बस्ते.       
          (नाशिक)

Previous Post Next Post