माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे प्रवेशोत्सव साजरा
"शिक्षण, संस्कार आणि शिस्त हेच यशाचे खरे सूत्र" — नाएसो संस्था उपाध्यक्ष तथा शाळा समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे
याप्रसंगी उपमुख्याध्यापक विजय मापारी,पर्यवेक्षक सूर्यभान जगताप, शशिकांत दंडगव्हाळ ,शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष दिलीप रौंदळ, माता पालक संघ इतर सदस्य,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , उपस्थित होते.
मुख्याध्यापक राजेंद्र कापसे , शालेय पदाधिकारी यांनी विद्यार्थांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.महिला शिक्षकानी विद्यार्थ्यांचे औक्षण केले. ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी संपूर्ण शालेय परिसरात सजावट करण्यात आली.तसेच इ 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्याना शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या शालेय पाठयपुस्तकांचे वाटप , संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे,मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांच्याहस्ते करण्यात आले. ग्रंथपाल अर्चना देवरे यांनी तसेच सर्व शिक्षकांनी पाठ्यपुस्तक वाटपासाठी सहकार्य केले.


