नियमित करा योग, दूर करा रोग
उंटवाडी प्राथमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
नाशिक: प्राथमिक विद्यालय उंटवाडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी योग शिक्षिका सौ. समीक्षा राजेंद्र निकम व सौ. अर्चना इंगोले उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यासाचे आरोग्यदायी फायदे, योगाचे जीवनातील महत्त्व आणि निरोगी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांकडून विविध योगासने व प्राणायाम करून घेण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुरेखा बोरसे यांनी स्वतः योगासने करून विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व तसेच संतुलित आहाराचे महत्त्व समजावून सांगितले.इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध आसने व प्राणायाम सादर केले. यावेळी सौ. घोडेराव, सौ. चौधरी, सौ. गायकवाड, सौ. बडगुजर, श्री. महाले व श्री. गवळे आदी शिक्षक उपस्थित होते.योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून नियमित योग करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.
