पेठे विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

 पेठे विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा


नाशिक (प्रतिनिधी)-नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम शालेय समिती अध्यक्ष देवदत्त जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळ व दुपार दोन्ही सत्रात मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.शाळेच्या प्रांगणात सकाळपासूनच विद्यार्थ्यांची, पालकांची आणि शिक्षकांची उत्साही गर्दी पाहायला मिळाली.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी वातावरण अधिक आनंददायी केले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करते प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर बदादे यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत नियमित अभ्यास, शिस्त आणि सातत्याचे महत्त्व अधोरेखित केले. यानंतर नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे पुष्पगुच्छ व पाठयपुस्तक,शालेय साहित्य देऊन स्वागत करण्यात आले. संस्था सहकार्यवाह शैलेश पाटोळे यांनी विद्यार्थ्यांना शाळेतील नियम, शिस्त आणि शिक्षणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
प्रसंगी बापू चव्हाण याच्या प्रयत्नातून शाळेला माननीय श्री.सतीश साळुंखे साहेब ( असिस्टंट डायरेक्टर, टाऊन प्लॅनिंग जळगाव) यांचेकडून होतकरू गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी वह्या, पेन्सिल ,खोडरबर व पेन इत्यादी वस्तूंची भरीव भेट देण्यात आली . साहित्य स्वीकार करताना शाळेचे मुख्याध्यापक माननीय गंगाधर बदादे, प्रशांत साबळे,मनीष जोगळेकर,बापू चव्हाण यांनी आदरणीय साळुंके साहेबांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले.

शालेय समिती अध्यक्ष देवदत्त जोशी सर यांनी व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.शाळा प्रवेशोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण झाली.विद्यार्थी व शिक्षक वाढदिवसाचे निवेदन संदीप शिनकर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली रोटवदकर यांनी केले,तर आभार शाळेचे पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमास पालक शिक्षक संघाच्या पदाधिकारी वर्षां कराड,तसेच शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post