सी.डी.ओ.मेरी हायस्कूल शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

 सी.डी.ओ.मेरी हायस्कूल शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा


नाशिक एज्युकेशन सोसायटीचे सी.डी.ओ. मेरी शाळेत प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत करुन पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र हात्ते यांनी शाळेतील सर्व नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.शाळेतील उपमुख्याध्यापक साहेबराव राठोड पर्यवेक्षक मनीषा साळवे सुनील घोलप पा. शि.संघांचे सर्व सदस्य शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका यांनी गुलाब पुष्प देऊन औक्षण करुन ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत केले.पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रमाप्रसंगी संस्था सहकार्यवाह पंढरीनाथ बिरारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.ग्रंथपाल बाबुराव मुरडनर व शाळेतील सर्व पदाधिकारी व शिक्षक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके देण्यात आली.विद्यमान नगरसेविका दिपाली गिते यांनी स्वतः विद्यार्थ्यांचे औक्षण करुन गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि मुलांना दररोज शाळेत उपस्थित राहून अभ्यासाबरोबर शालेय शिस्तीचे पालन करावे असे आव्हान केले.सर्व विद्यार्थ्यांनी खूप शिकून आपले व आपल्या शाळेचे नाव उज्वल करावे असे प्रतिपादन केले. सूत्रसंचालन ललिता बागुल यांनी केले.आभार उप मुख्याध्यापक यांनी मानले.शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते.
Previous Post Next Post