भारतीय जनता पार्टीच्या नाशिक उत्तर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी एस. के. पगार यांची नियुक्ती
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
नाशिक : भारतीय जनता पार्टीच्या नाशिक उत्तर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी एस. के. पगार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांनी ही नियुक्ती जाहीर केली.
एस. के. पगार यांनी पक्ष संघटन, सामाजिक कार्य तसेच जनसंपर्क क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.
या नियुक्तीमुळे भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बांधणीस अधिक बळ मिळणार असून ग्रामीण भागातील पक्षविस्तार व जनसंपर्क वाढीसाठी ते प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे
एस. के. पगार यांच्या निवडीबद्दल विविध राजकीय, सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
