नगरपरिषद शाळा क्रमांक २, मनमाड येथे माता-पालक मेळावा उत्साहात संपन्न
मनमाड, दि. २० जून २०२६ : नगरपरिषद शाळा क्रमांक २, मनमाड येथे आज दिनांक २० जून २०२६ रोजी माता-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास विद्यार्थ्यांच्या माता-पालक उपस्थिती होत्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित पालकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, उपस्थिती, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, विविध उपक्रम तसेच नवीन शैक्षणिक वर्षातील नियोजन याविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक व शिक्षक यांच्यात सातत्यपूर्ण संवाद आणि सहकार्य आवश्यक असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
मेळाव्यात पालकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भातील विविध प्रश्न व सूचना मांडल्या. शिक्षकांनी त्यांचे समाधानकारक निरसन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी घरातील अभ्यासाचे वातावरण, नियमित शाळा उपस्थिती, वाचन संस्कृती आणि स्वच्छतेचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी अनेक माता-पालकांनी मनोगत व्यक्त करून शाळेच्या शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या माता-पालक मेळाव्यामुळे पालक व शाळा यांच्यातील संवाद अधिक दृढ होऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास निश्चितच चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. सभेला मुख्याध्यापक श्री बाळासाहेब काटे, सहशिक्षक श्री समाधान ठोके, माता पालक जयश्री सोमीते,वैष्णवी पगारे, वैशाली सोनवणे, पूजा भालेराव, सीमा पासवान आदी उपस्थित होते.

