सी.डी.ओ.मेरी हायस्कूल शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
ना.ए.सोसायटी संचलित मेरी शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.मुख्याध्यापक रवींद्र हात्ते,उपमुख्याध्यापक शरद शेळके,पर्यवेक्षक सुनिल घोलप,मनीषा सावळे व सहकार्यवाह पंढरीनाथ बिरारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षिका तारा घोटेकर, नमस्कार शिंदे उपस्थित होते.यावेळी विद्यालयातील महिला शिक्षिका व कर्मचारी यांचा गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.विद्यार्थीनी खुशी वाघ व अस्मिता सोनार यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगितले.शिक्षक मनोगतातून नमस्कार शिंदे यांनी महिला दिनाचे महत्त्व स्पष्ट करत शिक्षण क्षेत्रातील महिलांचे मोलाचे योगदान अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महिला शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्या विद्यार्थ्यांना ज्ञानासोबत ममता, संयम व संस्कार देतात,असे त्यांनी आपले मत मांडले.प्रमुख पाहुणे तारा घोटेकर यांनी मार्गदर्शन करत स्त्रीशक्तीचे समाजातील महत्त्व स्पष्ट केले.अध्यक्षीय मनोगतातून उपमुख्याध्यापक शरद शेळके व पर्यवेक्षिका मनीषा सावळे यांनी स्त्रीशक्तीचा गौरव करत सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रविंद्र हात्ते यांनी केले. सूत्रसंचालन यशश्री रत्नपारखी यांनी केले. क्रीडा शिक्षक रवींद्र नाकील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमास सर्व विद्यार्थी व गुरुजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

