पेठे विद्यालयाच्या कलाशिक्षिका पुरस्काराने सन्मानित

 पेठे विद्यालयाच्या कलाशिक्षिका पुरस्काराने सन्मानित


महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

नाशिक(प्रतिनिधी )

नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालयातील कलाशिक्षिका रुपाली प्रशांत रोटवदकर यांना “समिज्ञा हिरकणी राज्यस्तरीय पुरस्कार २०२६” प्रदान करून त्यांच्या धैर्यशील, कर्तृत्ववान व प्रेरणादायी कार्याचा गौरव .समिज्ञा फाउंडेशनतर्फे दिला जाणारा हा पुरस्कार समाजात प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रदान केला जातो. या वर्षीच्या पुरस्कारासाठी रुपाली रोटवदकर यांची निवड करण्यात आल्याने शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याला विशेष मान्यता मिळाली आहे.सदर पुरस्कार सोहळा नुकताच -HCG मानवता हॉस्पिटल, नवीन रुद्र हॉल, नववा मजला, मुंबई नाका, नाशिक.या ठिकाणी नुकताच संपन्न झाला 

. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नारायणी हॉस्पिटलतर्फे जागतिक किडनी दिनानिमित्त आयोजित पोस्टर स्पर्धेत पेठे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला गेला. स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.शाळेच्या उत्कृष्ट व उल्लेखनीय सहभागाबद्दल कलाशिक्षिका रुपाली रोटवदकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक गंगाधर बदादे, उपमुख्याध्यापक साहेबराव राठोड, पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी, सहकार्यवाह शैलेश पाटोळे तसेच ज्येष्ठ शिक्षिका शर्मिली खानीवाले यांनी अभिनंदन केले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे पेठे विद्यालयाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांना नवे बळ मिळाले असून विद्यार्थ्यांमध्येही प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post Next Post