कळवणला गुरुवारी पेन्शन अदालत

 कळवणला गुरुवारी पेन्शन अदालत


महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

कळवण : कळवण

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी येत्या गुरुवार (दि.२ एप्रिल) रोजी सकाळी कळवण प्रकल्प कार्यालयात पेन्शन अदालत कळवण एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कश्मिरा संखे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे. तसेच यावेळी राज्य अध्यक्ष डी पी भरसट उपस्थित राहणार असल्याची माहिती पेन्शन अदालत अध्यक्ष तथा सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एस.के. पगार यांनी दिली. 

दिली आहे.

कळवण आदिवासी प्रकल्पात कळवण, देवळा, सुरगाणा, सटाणा, चांदवड मालेगाव, नांदगाव हे सात तालुके येतात. या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळा तसेच शासकीय वसतिगृह वर्ग ३ व वर्ग ४ चे अनेक कर्मचारी सेवा निवृत्त झालेले आहेत. त्यापैकी काही कर्मचारींचा मृत्यू देखील झाला आहे. त्यांना अजून पेन्शन सुरु झालेली नाही. अथवा त्यांच्या इतर प्रश्न प्रलंबित असून अन्य अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व ईतर अडीअडचणी जाणून घेण्यासाठी प्रकल्पस्तरावर काय मदत करता येईल, यासाठी कळवण एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डाॅ कश्मिरा संखे यांचे अध्यक्षतेखाली ही पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. तरी कळवण प्रकल्पातील सर्व सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांनी आपल्या अडीअडचणी लेखी स्वरूपात घेऊन या पेन्शन अदालतीला उपस्थित रहावे, असे आवाहन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पेन्शन अदालत प्रकल्प अध्यक्ष एस. के. पगार यांनी केले आहे. 

Previous Post Next Post