गुढीपाडवा उत्साहात साजरा

 गुढीपाडवा उत्साहात साजरा


महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

दि. १९/०३/२०२६ रोजी सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर,नाशिक-१ शाळेत गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात गुढी उभारून व पूजन करून करण्यात आली. *मा.मुख्याध्यापक श्री.राजेंद्र निकम सर* तसेच शिक्षकांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गुढीपाडव्याचे महत्त्व सांगणारी भाषणे, कविता व गाणी सादर केली. काही विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा अनुष्का भोईर व सिद्धी खैरनार या विद्यार्थिनींनी गुढीपाडव्याची माहिती सांगितली करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुढीपाडवा या सणाचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व समजावून सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. हा कार्यक्रम आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमास जेष्ठ शिक्षक व शिक्षक प्रतिनिधी श्री.अशोक शिरुडे तसेच निलिमा गायधनी,अश्विनी पगार,किशोरी शुक्ल,मंजुषा झेंडे,भावना नागपुरे,छाया जाधव,प्राजक्ता क्षिरसागर, विभाग प्रमुख सौ.मनिषा जोशी इत्यादी शिक्षक वृंद व पालक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Previous Post Next Post