विद्यार्थांनी अनुभवले शिव शस्त्र शौर्यगाथा फिरते वस्तू संग्रहालय
सिडको -नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचलनाच्यावतीने शिवशस्त्र शौर्यगाथा फिरते वस्तू संग्रहालय दिनांक 12 /03/2026 ते 14/03/2026 या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आले होते.
शासनाचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम असून माध्यमिक विद्यालय उंटवाडी, प्राथमिक विद्यालय उंटवाडी, इंग्लिश मिडियम स्कूल उंटवाडी, नवजीवन डे स्कूल, गुलाबराव पाटील विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन बघितले. शिवकालीन शस्त्रे, तलवारी, भाले, धनुष्य बाण, दांडपट्टा इत्यादी ऐतिहासिक शस्त्रे याबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळाली. शिवाजी महाराज तसेच मावळे यांनी शस्त्रांचा वापर कसा केला यावर आधारित सुंदर व्हिडिओ क्लिप दाखविण्यात आली. सदर प्रदर्शन विद्यार्थांसाठी अतिशय उपयुक्त आहे.यासाठी पुरातत्व विभागाच्या वतीने भाग्यश्री वाघ, नागेश्वर करवंदे ,शुभम भोबस्कर ,
धीरज सोडये ,अनिकेत पवार,
मुकुंदा रेवलेकर यांनी सहकार्य केले.
संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, मुख्याध्यापक राजेंद्र कापसे, उपमुख्याध्यापक विजय मापारी,पर्यवेक्षक सूर्यभान जगताप,शशिकांत दंडगव्हाळ,शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी शासनाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
सदर प्रदर्शन दिनांक 22 मार्च 2026 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 8.00 पर्यंत उदाजी महाराज म्युझियम ऑफ एज्युकेशनल हेरिटेज गंगापूर रोड नाशिक येथे खुले आहे. सर्वांनी त्यांचा लाभ घ्यावा असेल आवाहन शासनाच्या पुरातत्व विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

