सी डी ओ मेरी हायस्कूल शाळेत'जल दिन'उत्सहात संपन्न
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या मेरी शाळेत जागतिक जल दिन कार्यक्रम उत्सहात साजरा करण्यात आला.जल दिनानिमित्त इ ६ वी च्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र हात्ते यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.शाळेच्या जेष्ठ शिक्षिका तारा घोटेकर यांनी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व पाणी कलश पूजन करून केली. शाळेच्या गीत मंचाने स्वागत गीत सादर केले. पाण्याचे महत्व,पाणी संवर्धन,पाण्याचे फायदे, पाणी प्रदूषण अशा विविध विषयांवर आराध्या गीतेकर,अक्षया भोंडवे, गुंजन शेलार,प्रतीक्षा माळी, दुर्वा जाधव,तनिष्का खैरनार या विद्यार्थिनींनी भाषण व पथनाट्यातुन माहिती सांगितली.पाणी बचत विषयी शाळेत विविध घोष वाक्ये व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली.उपमुख्याध्यापक शरद शेळके यांनी पाणी बचतीची विविध उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. शाळेचे पर्यवेक्षक सुनील घोलप यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्व पटवून सांगितले.व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षिका भारती भोये उपस्थित होत्या.कार्तिकी शिंपी या विद्यार्थिनीने शाळेत सर्वांना जल प्रतिज्ञा दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृषा मोरे व आभार तेजल बागुल या विद्यार्थिनीने मानले.या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक,विद्यार्थी,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

