अभिमानास्पद : वैशाली गोपाल भगत एमरॉल्ड डायरेक्टर लिडर पुरस्काराने सन्मानित

 अभिमानास्पद : वैशाली गोपाल भगत एमरॉल्ड डायरेक्टर लिडर पुरस्काराने सन्मानित


महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

विशेष प्रतिनिधी - सन्मान स्त्रीत्वाचा... जागर नारी शक्तीचा... या उक्तीप्रमाणे नारी ही समाजाची कुशल वास्तुकार आहे आणि आपली संस्कृती स्त्रीला देवी मानणारी आहे, आपल्या महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. यातीलच एक क्षेत्र आहे मार्केटिंग क्षेत्र या क्षेत्रातील एका महिलेने आपल्या जिद्दी आणि चिकाटी च्या जोरावर साडे तीन वर्षांत तब्बल वीस लाखांच्या वर कमाई करीत एमरॉल्ड डायरेक्टर लिडर हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार प्राप्त केला आहे. त्या आहेत वुई आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वैशाली गोपाल भगत. यांनी अल्पावधीतच उत्तुंग भरारी घेत सर्वोत्कृष्ट एमरॉल्ड डायरेक्टर लिडर हा पुरस्कार प्राप्त केला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्र बाहेर सुद्धा वुई आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने प्रो-विंग्स सॅनिटरी नॅपकिनच्या माध्यमातून लाखो महिलांना जोडून एक परिवार उभा केला आहे. वुई आर मोर मध्ये काम करणे म्हणजे स्वप्नपूर्ती करणे, ही कंपनी बिजनेस साठी नाहीतर एक कुटुंब एक मोठा परिवार तयार झाला आहे. वुई आर मोर या कंपनीचे सर्वेसर्वा विकास गोपाळ व डायरेक्टर प्रिया कड यांच्या मार्गदर्शनाखाली वुई आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा सहावा वर्धापनदिनाचा भव्य दिव्य सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. वैशाली गोपाल भगत या सर्वसामान्य कुटुंबातील असून देखील त्यांनी सर्वांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या रणरागिणी ने आयुष्याच्या या रणांगणावर स्वतःला सिद्ध केले. जगभरात कोरोना चा थैमान सुरू असताना सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य महिलांच्या सुरक्षेसाठी 3 जानेवारी 2022 रोजी वुई आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जाईन करून आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. विविध माध्यमातून यशस्वी वाटचाल करीत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीत भरारी घेतली आहे. विशेष वैशाली भगत यांचे अथक परिश्रम, मजबूत नेतृत्व आणि टीमसाठीच्या नि:स्वार्थ समर्पणामुळे त्यांची प्रगती होत आहे. लिडर कसा असावा हे त्यांच्या कडे पाहिले की लक्षात येते. त्यांनी केवळ स्वतः यश संपादन केले नाही, तर अनेकांना यशाचा मार्गही दाखवला आहे. त्यामुळे योग्य व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. विशेषता हा पुरस्कार सोहळा वाशी येथील एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई कार्याध्यक्ष तथा ट्रस्टी सिद्धिविनायक मंदिर न्यास प्रभादेवी मनीषा तुपे गुरुदेव विनोद सुवर्णा, अभिनेत्री वनिता खरात, अभिनेता संतोष जुवेकर, डॉ. धनंजय पाटील, चंद्रकांत पाटील, कंपनीचे चेअरमन विकास गोपाळ, डायरेक्टर प्रिया कड, दिनेश शिंदे, संजय लाड, संदीप भालेकर, यांच्या सह सुमारे महाराष्ट्रातून पाच हजारापेक्षा जास्त महिला सदस्य उपस्थित होत्या. ------------ न्यूज मराठी साठी बोलताना वैशाली भगत म्हणाल्या की, मी सामान्य महिला गृहिणी होते मात्र वुई आर मोर कंपनी जॉईन केल्यानंतर आज लखपती ते करोडो च्या दिशेने वाटचाल करीत असल्याचा आनंद व्यक्त करत हे केवळ वुई आर मोर कंपनी मुळेच आज आम्ही त्या पदावर आहोत. दुर्दम्य इच्छाशक्ती, निश्चय आणि समर्पण खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही कोणतेही करीयर निवडलेत, तरी, त्यात संपूर्ण समर्पण देऊन कष्ट करा आणि तुमच्यातही हे सामर्थ्य आहे. फक्त ठाम निर्धार करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि वाटचाल सुरू करा. व्यवसाय करण्यासाठी, आपलं स्वप्न साकार करण्यासाठी, वय किंवा परिस्थिती कधीच अडथळा ठरत नाही. मनात ठरवलं, तर काहीच अशक्य नाही असे वैशाली गोपाल भगत म्हणाल्या.

Previous Post Next Post