माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे जागतिक जल दिन साजरा

माध्यमिक विद्यालय ,उंटवाडी येथे जागतिक जल दिन साजरा



 

महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

  नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्याध्यापक राजेंद्र कापसे,शाळेचे माजी विद्यार्थी मयूर शिरोडे, अंकिता शिरोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक जल दिन उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी उपमुख्याध्यापक विजय मापारी, पर्यवेक्षक सूर्यभान जगताप, शशिकांत दंडगव्हाळ, शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर, ज्येष्ठ शिक्षक दिलीप पवार, प्रवीण जाधव, रफिक इनामदार, मंगला मोरे,सुनंदा कुलकर्णी,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते.

           या कार्यक्रमाचे आयोजन इ. ७ वी 'अ' च्या वर्गाने केले त्यांना सहकार्य वर्गशिक्षिका शितल मोरे ,यांनी केले प्रमुख अतिथी परिचय शाळेचे पर्यवेक्षक शशिकांत दंडगव्हाळ यांनी केले तर शालेय विद्यार्थी वेदांत गायकवाड, आरोही चौधरी ,प्रतिक्षा इदे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा शाळेचे माजी विद्यार्थी मयूर शिरोडे यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत पाण्याचे महत्व विद्यार्थ्यांना विविध उदाहरण देत पटवून दिले संस्था उपाध्यक्ष तथा शाळेचे शाळा समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, मुख्याध्यापक राजेंद्र कापसे, यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्व सांगितले व पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक विजय मापारी यांनी मानवी जीवनात पाण्याचे महत्व कसे आहे हे विविध उदाहरण देत विद्यार्थ्यांना पटवून दिले तर ज्येष्ठ शिक्षक रफिक इनामदार यांनी विद्यार्थ्याना जल प्रतिज्ञा दिली .प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले .या प्रसंगी माजी विद्यार्थी मयूर शिरोडे यांनी शाळेतील विद्यार्थ्याांसाठी पिण्याच्या पाण्यााचेे दोन जलशुद्धीकरण यंत्र शाळेस भेट दिली त्यानिमित्त मान्यवरांचे हस्ते मयूर शिरोडे, अंकिता शिरोडे यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्याांनी बॅनर व घोषवाक्य याचे वाचन केले तसेच गोदागीत यावर इ.६ वी 'ड' व इ.७ वी 'अ' च्या विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्य सादर केले.तर ५ वी ' ब 'च्या विद्यार्थ्यांनी जल दिनानिमित्त नाटिका सादर केली याप्रसंगी जलदिंडी तसेच चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्यात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थिनी कु.तोरल शिंदे हिने केले.तर आभार कु.सई दरगुडे हिने मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षिका शितल मोरे व ऐश्वर्या काळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post Next Post