नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांची इंग्रजीवर पकड; कोठारी फाउंडेशनतर्फे गुणवंतांचा गौरव"

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांची इंग्रजीवर पकड; कोठारी फाउंडेशनतर्फे गुणवंतांचा गौरव"


महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

नाशिक – नाशिक एज्युकेशन सोसायटी व हेमेन्द्रभाई कोठारी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लीप फॉर वर्ड इंग्रजी भाषा प्रशिक्षण उपक्रमांतर्गत पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. हा कार्यक्रम मा. संस्था अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांच्या अध्यक्षतेखाली आणि फाउंडेशनच्या फायनान्स हेड कपिल भाई ठक्कर यांच्या उपस्थितीत पार पडला.

प्रमुख पाहुणे कपिलभाई ठक्कर यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविण्याचे महत्त्व सांगितले आणि लीप फॉर वर्ड उपक्रमाबाबत कौतुक व्यक्त केले. संस्था अध्यक्ष प्रा. दिलीप फडके व संस्था कार्यवाहक राजेंद्र निकम यांनी फाउंडेशनच्या विशेष सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले.

या प्रसंगी विद्यार्थ्यांना आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना लीप फॉर वर्डच्या वतीने गौरविण्यात आले. तसेच सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर, नाशिक (प्राथमिक विभाग) व माध्यमिक विद्यालय उंटवाडी (माध्यमिक विभाग) यांना NES ELS Championship School म्हणून सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थ्यांचा शोकेस राऊंड ही सुंदर स्पर्धा लीप फॉर वर्ड टीमच्या सदस्यांनी – स्वरुपा फडके, नीता भणगे, सानिका आठवले, आदित्य महाडिक, रामकृष्ण स्वाइन – यांचे आयोजन केले. या स्पर्धेत संस्थेच्या मराठी माध्यमातील शाळेतून २८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती, त्यांच्यासाठी विशेष स्पर्धा घेण्यात आली आणि त्यांना सन्मानित केले गेले. तसेच १३ शिक्षकांना स्पोक पर्सन अवॉर्ड देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल कोठावदे यांनी केले, पाहुण्यांचा परिचय सोनाली चिंचोले यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन कार्यवाह राजेंद्र निकम यांनी मानले.

याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. चंद्रशेखर मोंढे, कार्यवाहक श्री. राजेंद्र निकम, सहकार्यवाहक शैलेश पाटोळे, पंढरीनाथ बिरारी, उमेश कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य रंजना परदेशी, सारडा कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ, तसेच विविध शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Previous Post Next Post