दिवंगत बसवराज परमसाली यांच्या स्मृतीनिमित्त हायवे वस्ती शाळेत क्रीडा गणवेश व खाऊ वाटप
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हायवे वस्ती येथे कै. बसवराज परमसाली यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश (स्पोर्ट ड्रेस) आणि खाऊचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम एच.ए.एल. (HAL) मधील कर्मचारी श्री. अजय परमसाली यांच्या वतीने राबवण्यात आला.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात श्री. अजय परमसाली, सौ. परमसाली आणि माजी कामगार युनियनचे सदस्य श्री. नितीन पगारे यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र साळुंखे आणि श्रीमती सुवर्णा कदम यांनी पाहुण्यांचे स्वागत व सत्कार केला.
नव्या कोऱ्या क्रीडा गणवेशात विद्यार्थ्यांना पाहून उपस्थित पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले. शाळेची गुणवत्ता आणि प्रगत शिक्षण पद्धतीचे श्री. परमसाली यांनी विशेष कौतुक केले. या छोटेखानी सोहळ्याचे आभार प्रदर्शन जिल्हा परिषद शाळा देवीचामाथा येथील मुख्याध्यापक श्री. देवेंद्र वाघ यांनी केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
.
