माध्यमिक विद्यालय,उंटवाडी येथे स्त्री शक्तीचा सन्मान
सिडको - नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून व्ही मार्ट चे संचालक निलेश कोठारी, अरुणा कोठारी, योगिता कोठारी हे उपस्थित होते.याप्रसंगी विद्यालयातील महिला कर्मचारी यांचा महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला.याप्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र कापसे, उपमुख्याध्यापक विजय मापारी, पर्यवेक्षक सूर्यभान जगताप, शशिकांत दंडगव्हाळ, शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर , जेष्ठ शिक्षक संतोष देवांग, दिलीप पवार,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांनी केले.प्रमुख पाहुणे योगिता कोठारी यांनी महिला दिनाच्या सर्व कर्मचारी वृंद यांना शुभेच्छा दिल्या.संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, पर्यवेक्षक सूर्यभान जगताप, ज्येष्ठ शिक्षक प्रविण जाधव,शिक्षक केशव बोडके यांनी महिला दिनाचे महत्व पटवून दिले.शालेय विद्यार्थी जसराज निकम, हार्दिक वडनेरे, रूद्र जाधव, मीत जाधव , अथर्व मोहिते, भावेश पाटील यांनी आपल्या आई विषयी तसेच राजमाता जिजाऊ, आदर्श महिला या यांच्या जीवनकार्याविषयी सांगून कविता सादर केल्या.सुनील कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय गीतमंचाने स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश सूर्यवंशी यांनी केले तर आभार ज्येष्ठ शिक्षिका प्रणाली देशपांडे यांनी मानले.तसेच याप्रसंगी गुरुकृपा महिला बचत गटामधील महिला कर्मचारी यांचा सन्मान केला.

