नाशिक एज्युकेशन सोसायटीचा उद्या १०४ वा वर्धापन दिन; परशुराम सायखेडकर नाट्यगृहात सोहळ्याचे आयोजन

 नाशिक एज्युकेशन सोसायटीचा उद्या १०४ वा वर्धापन दिन; परशुराम सायखेडकर नाट्यगृहात सोहळ्याचे आयोजन



महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 


नाशिक:- नाशिकमधील शैक्षणिक क्षेत्रात 'उज्ज्वल यशाची परंपरा' लाभलेली अग्रगण्य संस्था 'नाशिक एज्युकेशन सोसायटी' उद्या, बुधवार दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी आपल्या १०४ व्या वर्षात पदार्पण करत आहे. या गौरवशाली प्रवासाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने भव्य वर्धापन दिन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.उद्या सकाळी १०:०० वाजता शहराच्या मध्यवर्ती भागातील परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे हा सोहळा संपन्न होईल. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून 'सायबर मैत्र'च्या संस्थापक आणि ज्येष्ठ पत्रकार-लेखिका मा. मुक्ता चैतन्य उपस्थित राहणार आहेत.'विद्यार्थ्यांच्या मोबाईलचे करायचे काय' या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षपद नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. प्रा. दिलीप फडके भूषवणार आहेत.याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, अ‍ॅड. जयदीप वैशंपायन, कार्यवाह राजेंद्र निकम तसेच शिक्षक मंडळाच्या अध्यक्षा सौ. नंदा पेटकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. संस्थेच्या या १०४ व्या वर्धापन दिन सोहळ्याला सर्व सभासद, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उत्सव समितीच्या निमंत्रक सौ. प्राजक्ता क्षीरसागर व संस्थेचे पदाधिकारी यांनी केले आहे.


Previous Post Next Post