श्री ज्ञानेश्वर पोपट ठाकरे यांना राज्यस्तरीय शिवछत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार जाहीर २५ एप्रिल रोजी मालेगावात सन्मान.

 श्री ज्ञानेश्वर पोपट ठाकरे यांना राज्यस्तरीय शिवछत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार जाहीर २५ एप्रिल रोजी मालेगावात सन्मान.



महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

कळवण (प्रतिनिधी) आश्रयआशा फाऊंडेशन वऱ्हाणे संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार सन्मान सोहळा २०२६ अंतर्गत "आदर्श शिक्षक पुरस्कार" व "आदर्श समाजकार्य" पुरस्कारासाठी श्री ज्ञानेश्वर पोपट ठाकरे सर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुकापूर, वडपाडा. मूळ गाव- मु.पो.आठंबे ता.कळवण जि.नाशिक यांची महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तींमधून निवड जाहीर करण्यात आली आहे.

या पुरस्काराचे वितरण येत्या २५ एप्रिल रोजी मालेगाव येथे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक आय.पी.एस सदस्य महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे माननीय श्री.प्रतापराव दिघावकर साहेब, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत साहेब व विविध प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानित केले जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र पाटील राऊत साहेब यांनी दिली. भारतीय जनता पक्ष शिक्षकआघाडी कळवण तालुकाध्यक्ष, शिक्षक भारती संघटना कळवण तालुकाध्यक्ष तथा पोलीसमित्र अभोणा व सामाजिक कार्यकर्ते म्हणून श्री ज्ञानेश्वर ठाकरे यांची ओळख आहे.


"कोरोना" सारखा रोग आल्यानंतर सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आले. सप्तशृंगी गडावर दर्शन घेण्यासाठी जाणारे भाविक बंद झाल्यामुळे त्यांनी आणलेल्या प्रसादावर आपली उपजीविका भागविणारे मुके प्राणी यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली हे ओळखून समाजात दातृत्व जपणारे लोक असतील तर मुक्या प्राण्यांची भावना देखील समजली जाऊ शकते या उक्तीतून त्यांना विविध प्रकारची फळे या काळात श्री. ज्ञानेश्वर ठाकरे यांनी न चुकता रोज आई सप्तशृंगी माता गडावरील मुक्या प्राण्यांना सलग एक वर्ष खायला दिले जोपर्यंत लॉकडाऊन सुरळीत होत नाही तोपर्यंत ही सेवा अविरत केली आहे.तसेच कला- क्रीडा,शैक्षणिक, व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कामे अतिशय उल्लेखनीय आहेत.

या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना यंदाचा मानाचा अखिल महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय "आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श सामाजिक सेवा पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आल्याचे संस्थेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

या अगोदर त्यांना सलग तीन जिल्हास्तरीय व पाच राज्यस्तरीय असे एकूण आठ पुरस्कार मिळालेले आहेत.

हा सन्मान सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार असून, समाजकार्याला नवीन प्रेरणा देणारा कार्यक्रम आहे. यामुळे श्री ज्ञानेश्वर ठाकरे सर यांना विविध क्षेत्रातून कौतुकाची थाप मिळत आहे..

या बहुमोल यशस्वी कार्यासाठी श्री ज्ञानेश्वर ठाकरे सर यांना जय योगेश्वर भगवान सामाजिक व शैक्षणिक मंडळ विंचुरे तालुका बागलाण, संस्थेचे अध्यक्ष श्री संजयजी गायकवाड साहेब सचिव सौ.संगीताताई गायकवाड मॅडम युवा नेतृत्व श्री तेजुदादा गायकवाड व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुकापूर,वडपाडा शाळेचे मुख्याध्यापक श्री शरदचंद्र काकुस्ते सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि भगिनी, पोलीस स्टेशन अभोना येथील सन्माननीय सर्व मित्रपरिवार तसेच सुकापूर,वडपाडा गावाच्या सरपंच आदरणीय सौ.लताताई लक्ष्मण दळवी व ग्रामस्थ. आठंबे,अभोना गावाचे ग्रामस्थ. क्रिकेट क्लब अभोना सर्व मित्रपरिवार, विविध शिक्षक संघटना सर्व मित्र परिवार,भगवती ट्रॅक्टर अभोना गॅरेजचे संचालक आमचे खास मित्र श्री शुभम गवळी साहेब पंचक्रोशीतील सर्व क्षेत्रातील मित्रपरिवार या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

श्री ज्ञानेश्वर ठाकरे सर यांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन..

Previous Post Next Post