दि ओझर मर्चन्टस् बँकेला ४ कोटी १२ लाखांचा नफा; ठेवी आणि कर्जातही मोठी वाढ

 दि ओझर मर्चन्टस् बँकेला ४ कोटी १२ लाखांचा नफा; ठेवी आणि कर्जातही मोठी वाढ


महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

ओझर (प्रतिनिधी):

निफाड तालुक्याची आर्थिक वाहिनी समजल्या जाणाऱ्या 'दि ओझर मर्चन्टस् को-ऑपरेटिव्ह बँकेने' आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे. या वर्षात बँकेला ४ कोटी १२ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला असून, सर्व कायदेशीर तरतुदी वजा जाता ९१ लाख २७ हजार रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त झाला आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन राजेंद्र दत्तात्रय शिंदे यांनी दिली.

बँकेच्या प्रगतीचा आलेख:

चेअरमन शिंदे यांनी पुढे सांगितले की, बँकेने प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या प्रगतीचा आलेख कायम राखला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत बँकेच्या ठेवींमध्ये ६ कोटी ७९ लाखांची वाढ होऊन त्या १२५ कोटी ५१ लाखांवर पोहोचल्या आहेत. तसेच, कर्ज वाटपातही ९ कोटी ७२ लाखांची वाढ होऊन ते ८५ कोटी ५१ लाख रुपये झाले आहे.

आर्थिक स्थिती आणि नेट एन.पी.ए.:

बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असून सध्या बँकेचे वसूल भाग भांडवल ४ कोटी ३१ लाख आणि स्वनिधी २३ कोटी ३३ लाख रुपये आहे. बँकेची एकूण गुंतवणूक ५९ कोटी ८८ लाख असून खेळते भांडवल १५८ कोटी १४ लाख रुपये आहे. विशेष म्हणजे बँकेचा नेट एन.पी.ए. ४.३५% इतका नियंत्रित ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे.

यांची लाभली उपस्थिती:

यावेळी बँकेचे व्हा. चेअरमन प्रवीण लल्ला, जनसंपर्क संचालिका मंगला कदम, संचालक भालचंद्र कासार, रवींद्र भट्टड, विजय शिंदे, भारत पल्हाळ, लक्ष्मण सोनवणे यांच्यासह संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी शरद वालझाडे, जनरल मॅनेजर मनसुखलाल छाजेड आणि कर्मचारी उपस्थित होते.

सभासदांना लाभांश देणार:

"शेतमालाचे कोसळलेले भाव आणि आर्थिक अस्थिरता  सभासदांनी बँकेवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळेच बँकेने २११ कोटींच्या व्यवसायाचा टप्पा ओलांडला असून, यंदा सभासदांना योग्य लाभांश देण्याचा मानस आहे," असे प्रतिपादन चेअरमन राजेंद्र शिंदे यांनी केले.


Previous Post Next Post