महात्मा फुले द्विशताब्दी वर्षाच्या निमित्ताने पेठे विद्यालयात अभिवादन व उपक्रमांना प्रारंभ”

महात्मा फुले द्विशताब्दी वर्षाच्या निमित्ताने पेठे विद्यालयात अभिवादन व उपक्रमांना प्रारंभ”


महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

नाशिक (प्रतिनिधी) :

नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालयात महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून त्यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना प्रारंभ करण्यात आला.या प्रसंगी मुख्याध्यापक गंगाधर बदादे, उपमुख्याध्यापक साहेबराव राठोड, पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी तसेच सहकार्यवाह शैलेश पाटोळे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.महात्मा जोतीराव फुले हे आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, थोर समाजसुधारक आणि शिक्षणतज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी १९व्या शतकात जातीय विषमता, अंधश्रद्धा व शिक्षणावरील बंधने यांविरुद्ध लढा देत सत्यशोधक समाजाची स्थापना केली. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून त्यांनी समाज परिवर्तनासाठी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.सन २०२७ मध्ये महात्मा फुले यांच्या जयंतीला २०० वर्षे पूर्ण होत असल्याने राज्य शासनाने हे वर्ष द्विशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढविन्याच्या उद्देशाने “महात्मा फुले शैक्षणिक प्रेरणा सप्ताह” साजरा करण्याचे शाळेत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच महात्मा फुले द्विशताब्दी वर्षांतर्गत अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलेत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समता, मूल्याधिष्ठित शिक्षण व विचारप्रबोधन घडविण्यावर भर दिला जाणार आहे.

Previous Post Next Post