पेठे विद्यालयात FLNAT परीक्षेचे यशस्वी आयोजन

 पेठे विद्यालयात FLNAT परीक्षेचे यशस्वी आयोजन


महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

नाशिक : केंद्रपुरस्कृत उल्लास – नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षा रविवार, दि. 29 मार्च 2026 रोजी पेठे विद्यालयात उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.सकाळी 10.00 ते सायं. 5.00 या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेत असाक्षर व्यक्तींनी सक्रिय सहभाग नोंदविला. परीक्षेपूर्वी शिकणाऱ्यांची निवड (Shortlisting) तसेच स्वयंसेवक (VT) व शिकणाऱ्यांचे टॅगिंग प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आली होती.या उपक्रमासाठी केंद्रसंचालक म्हणून श्री. साहेबराव राठोड यांनी नियोजनाची सूत्रे हाताळली, तर पर्यवेक्षक म्हणून सौ. रूपाली रोटवदकर यांनी परीक्षा प्रक्रियेवर देखरेख ठेवली. तपासणीसाठी भाऊसाहेब भोंडवे, लिपिक म्हणून आलोक पाठक तसेच कर्मचारी म्हणून ज्ञानेश्वर नवले यांनी सहकार्य केले. परीक्षेत एकूण 5 असाक्षर व्यक्तींनी सहभाग घेतला.या संपूर्ण उपक्रमासाठी मुख्याध्यापक गंगाधर बदादे, उपमुख्याध्यापक साहेबराव राठोड, पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी व सहकार्यवाह शैलेश पाटोळे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या योग्य नियोजनामुळे परीक्षा सुरळीत व यशस्वीरीत्या पार पडली.

Previous Post Next Post