पेठे विद्यालयाचा अभिमान : दोन विद्यार्थी राष्ट्रपती स्काऊट प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

पेठे विद्यालयाचा अभिमान : दोन विद्यार्थी राष्ट्रपती स्काऊट प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण



महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

नाशिक(प्रतिनिधी): पेठे विद्यालय, रविवार कारंजा येथील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या यशाची परंपरा कायम ठेवत राष्ट्रीय स्तरावर मानाचे स्थान मिळवले आहे. विद्यालयातील सार्थक संजय हिंगमिरे व तेजस अशोक गुजर या दोन विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती स्काऊट प्रमाणपत्र परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे.ही परीक्षा राष्ट्रीय पातळीवर घेतली जात असून, उत्तीर्ण विद्यार्थ्यांना राष्ट्रपती यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते. त्यामुळे या यशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन्ही विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम व चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.या यशामागे स्काऊट मास्टर महेंद्र गावित, भाऊसाहेब भोडवे,मधुकर हिंडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते.त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाली.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. मा. दिलीप फडके, उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, जयदीप वैशंपायन, कार्यवाह राजेंद्र निकम तसेच इतर पदाधिकारी यांनी त्यांचे कौतुक केले.

तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी व जिल्हा आयुक्त स्काऊट, तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी विविध शाळांचे मुख्याध्यापक व अधिकारी उपस्थित होते.पेठे विद्यालयाचे मुख्याध्यापक गंगाधर बदादे, उपमुख्याध्यापक साहेबराव राठोड, पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी आणि सहकार्यवाह शैलेश पाटोळे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.या यशामुळे विद्यालयाचा मान उंचावला असून, दोन्ही विद्यार्थ्यांवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Previous Post Next Post