माजी विद्यार्थ्यांकडून पेठे विद्यालयाला ‘स्मार्ट डिजिटल पॅनल बोर्ड’ भेट

 माजी विद्यार्थ्यांकडून पेठे विद्यालयाला ‘स्मार्ट डिजिटल पॅनल बोर्ड’ भेट


महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

 नाशिक(प्रतिनिधी) : नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत इ-लर्निंगला चालना देण्यासाठी स्मार्ट डिजिटल बोर्ड भेट देण्यात आले.

पेठे विद्यालयाच्या १९७६ च्या माजी विद्यार्थ्यांच्या बॅचकडून (१९७६–२०२६) सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शाळेला दोन स्मार्ट पॅनल बोर्ड सप्रेम भेट देण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक प्रभावी व्हावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

या प्रसंगी संस्था अध्यक्ष प्रा. दिलीप फडके सर, कार्यवाह राजेंद्र निकम, मुख्याध्यापक गंगाधर बदादे, उपमुख्याध्यापक साहेबराव राठोड, पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी, सहकार्यवाह शैलेश पाटोळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल संस्थेच्या वतीने कार्यवाह राजेंद्र निकम, मुख्याध्यापक गंगाधर बदादे आणि शिक्षकवृंद यांनी आभार व्यक्त केले.

Previous Post Next Post