विराट हिंदू संमेलन उत्साहात संपन्न

 विराट हिंदू संमेलन उत्साहात संपन्न



महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

पाथर्डी फाटा (प्रतिनिधी) : साईराम जन विकास बहुउद्देशीय सेवा संस्था आयोजित “विराट हिंदू संमेलन” रविवारी (दि. ५ एप्रिल २०२६) रोजी गामने मैदान, वासन नगर येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडले. या संमेलनाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. अनिल महाराज देवळेकर यांनी आपल्या कीर्तनातून धर्म, संस्कृती आणि सदाचार यांचे महत्त्व पटवून दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. पंकज नागमोती यांनी हिंदू समाजातील एकता, संघटन आणि सामाजिक जबाबदारी यावर मार्गदर्शन केले. तसेच मातृशक्ती वक्त्या सौ. ज्योती ताई वाघचौरे यांनी महिलांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित करत प्रेरणादायी विचार मांडले.

कार्यक्रमात ‘एक्स्प्रेशन्स संगीत अकादमी’ समूहाकडून शास्त्रीय संगीत व वाद्यांचे सुरेल सादरीकरण करण्यात आले. याशिवाय पारंपरिक शस्त्र प्रात्यक्षिकाने उपस्थितांची विशेष दाद मिळवली.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.

एकूणच, “विराट हिंदू संमेलन” धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचा संदेश देत प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाले.

Previous Post Next Post