आकाश दहाडदे यांच्या विवाह सोहळ्यात 'संविधान प्रत' देऊन अनोखा सदिच्छा उपक्रम; शरदभाऊ आहेर यांची प्रमुख उपस्थिती
श्रीरामपूर: ओझर (ता. निफाड) येथील प्रसिद्ध उद्योजक राजू शेठ दहाडदे यांचे चिरंजीव तथा शेवगाव तालुक्याचे तहसीलदार आकाश दहाडदे यांचा शुभविवाह नुकताच श्रीरामपूर येथे उत्साहात पार पडला. या विवाह सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे, नवदांपत्याला जनसेवा मंडळाच्या वतीने भारतीय संविधानाची प्रत भेट देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी नाशिक जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जनसेवा मंडळाचे मार्गदर्शक शरदभाऊ आहेर यांनी उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले. "प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना संविधानाचे मूल्य जोपासणे ही काळाची गरज आहे," अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. याप्रसंगी जनसेवा मंडळाचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि दहाडदे परिवाराचे स्नेहसंबंधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

