पल्लवी खांदवे यांना 'पीएच.डी. प्रदान
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
नाशिक, ओझर : मविप्र संचालित कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रा. पल्लवी खांदवे यांनी सादर केलेल्या संशोधन प्रबंधास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच. डी. प्रदान केली आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत 'व्यवसाय प्रशासन' विषयात त्यांनी आपले संशोधन पूर्ण केले. श्रीमती पल्लवी खांदवे यांनी "उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रीयकृत बँकांना ग्रामीण भागात आधुनिक सेवा देताना येणाऱ्या प्रशासकीय समस्यांचा विश्लेषणात्मक अभ्यास" (कालावधी 2010 ते 2020) या विषयावर आपला शोधप्रबंध सादर केला होता. त्यांना सिल्वासा येथील एस.एस.आर. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजीव सिंह यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी आपले संशोधन कार्य के.आर.टी. कला, बी.एच. वाणिज्य व ए.एम. विज्ञान (के.टी.एच.एम.) महाविद्यालय, नाशिक येथील वाणिज्य विभागाच्या संशोधन केंद्रातून पूर्ण केले. याप्रसंगी अध्यक्ष डॉ मनोहर सानप, बहिस्थ परीक्षक डॉ. रणजीत तेहरा उपस्थित होते. या यशाबद्दल पल्लवी खांदवे यांचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस आहे
अॅड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ. सुनिल ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक शिवाजी गडाख, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव,शिक्षणाधिकारी प्राचार्य डॉ.डी. डी. लोखंडे, प्राचार्या डॉ कल्पना आहिरे, उपप्राचार्य डॉ वसंत बोरस्ते, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ सुजाता गडाख, आणि सर्व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले.
