शिक्षक- शिक्षकेतर संघटनांच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
"शिक्षण क्षेत्रातील ज्वलंत प्रश्नांकडे प्रशासनाचे वेधले लक्ष; विविध संघटनांतर्फे निवेदन सादर"
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
नाशिक:-महाराष्ट्र राज्य सरकारी - निमसरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती व महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ, टीडीएफ, व सहविचारी संघटना यांच्या वतीने आज पासून सुरू झालेल्या बेमुदत संपाच्या निमित्ताने नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात सभा घेण्यात आली व त्यानंतर माननीय उपजिल्हाधिकारी श्री राजपूत साहेब यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
विविध मागण्या
*१) सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतची विस्तृत अधिसूचना तत्काळ जारी करण्यात यावी.*
*२) सर्व कायम शिक्षकांना टीईटी सक्तीची अट रदद करणे.*
*३)एक नोव्हेंबर 2000 पूर्वी ज्या कर्मचारी अंशतः अनुदानावर नियुक्त तसेच 2005 नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तसेच वस्तीशाळा शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.*
*४) चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती वरील बंदी तात्काळ उठवावी.*
*५) १०:२०:३० वर्षाच्या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी.*
*६)सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना स्वास्थ्य विमा योजना लागू करावी.*
*७) सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात यावे.*
*८)प्रतीक्षा यादीतील अनुकंपा तत्वावरील सर्व कर्मचाऱ्यांनी नियुक्ती देण्यात यावी.*
*९) शिक्षण सेवक योजना रद्द करा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कायम नियुक्ती करण्यात यावी.*
*१०)15 मार्च 2024 संच मान्यतेचा अन्याय कारक संच मान्यतेचा निर्णय रदद करणे.*
*११) नवीन राष्ट्रीय शिक्षक धोरणाचा पुनर्विचार करण्यात यावी.*
*१२) संच मान्यता 2025-26 नुसार ठरलेल्या शिक्षक, शुन्य शिक्षकी झालेल्या शाळा, विद्यार्थी या बाबत शासना निश्चत धोरण ठरविणे.*
*१३) सर्व विनाअनुदानीत व अशंतः अनुदानीत शाळा 100 टक्के अनुदान देणे.*
*१४) शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांचे अशासकीय काम रदद करून त्यांना अध्यापन करू दयावे.*
यावेळी नाशिक विभाग टीडीएफचे कार्यवाह -मोहन चकोर, नाशिक जिल्ह्यातील कार्यवाह- अरुण पवार, कार्याध्यक्ष -किशोर जाधव, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे निलेश ठाकूर, यशवंत ठोके महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर विकास संघटना चे दशरथ जारस, हिरामण शिंदे, मुख्याध्यापक संघाचे भरत गांगुर्डे, बाबा खरोटे, ज्ञानेश्वर निंबेकर, शिक्षकेतर संघटनेचे संजय देवरे, भाऊसाहेब शिरसाट, नाशिक कला व्हिजनचे सचिन पगार, चंद्रशेखर सावंत, महेंद्र कुमार झोले, कपिल कापडणीस, दिलीप अहिरे, यांच्यासह पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते

