मारुती पतसंस्था ओझरला ढोबळ नफा १ कोटी ५९ लाख
ओझर (मिग) तालुका निफाड जि. नाशिक येथील मारुती ग्रामीण बिगरशेती सह पत संस्थेला सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात रुपये १ कोटी ५९ लाखाचा ढोबळ नफा झालेला असून करावयाच्या तरतुदी वजा जाता मार्च अखेर ७१ लाख ५५ हजार इतका निव्वळ नफा झालेला आहे.
संस्थेचा ३१ मार्च २०२६ अखेर ग्रॉस एनपीए ३.५२% असून नेट एनपीए ० % (शून्य) आहे. बँकेचे भाग भांडवल १ कोटी ७० लाख असून गुंतवणूक १७ कोटी ५७ लाख आहे. संस्थेच्या एकूण ठेवी ३९ कोटी ४९ लाख असून संस्थेने २९ कोटी ७ लाख कर्ज वाटप केलेले आहे. सी.डी रेशो ६१ % इतका आहे. संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानासह एस एम एस सेवा, आर टी जी एस, मोबाईल सेवा सभासदांना उपलब्ध करून दिलेली आहे, ग्राहक, खातेदार, सभासद यांना ग्राहक सेवा तत्पर व सौजन्यपूर्ण देण्यासाठी संचालक व कर्मचारी प्रयत्नशील असून ठेवीदार व सभासदांनी संस्थेच्या प्रती दाखविलेल्या विश्वासामुळे चालू आर्थिक वर्षात व्यवहारात भरीव वाढ झाल्यामुळे कर्जदार सभासदांनी वेळेत व्याज व कर्जाचा भरणा केल्यामुळे संस्थेला भरीव नफा झालेला आहे.
मारुती पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन श्री शिवाजी भाऊ पगार यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी संस्थेस प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत असे संस्थेचे चेअरमन श्री संजय शिवाजी पगार यांनी सांगितले.
व्हाईस चेअरमन श्री अशोक पल्हाळ, जनसंपर्क संचालक श्री रामराव गवळी, तज्ञ संचालक बाळासाहेब जाधव संचालक हनिफ अत्तार, रमेश बोरस्ते, निलेश लड्डा, प्रभाकर पगार, प्रविण निंबाळकर, वसंत भडके, तानाजी दमाले, कैलास पगार, श्रीमती शारदा गाडगे, सौ उज्वलाताई वाबळे, व्यवस्थापक बाळासाहेब खिलारी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
