नाशिक विभाग शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ)च्या प्रभारी सचिव (कार्यवाह)पदी श्री मोहन चकोर यांची नियुक्ती
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
नाशिक:-महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) ने नुकतेच एका पत्राद्वारे नाशिक विभाग टीडीएफच्या कोषाध्यक्षाचा कारभार पाहत असणारे श्री मोहन चकोर यांची सचिव (कार्यवाह) पदी निवड झाल्याची घोषणा केली आहे.
गेली ३०वर्ष शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ)चे प्रामाणिकपणे कार्यकर्ता म्हणून काम करत असताना नाशिक विभागात विशेषत: नाशिक जिल्ह्यामध्ये संघटनेचे काम अत्यंत प्रामाणिकपणे करत असताना शिक्षक - शिक्षकेतर बांधवांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी विविध प्रकारचे धरणे,आंदोलने व संप यांच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. या कामाची पावती म्हणूनच महाराष्ट्र टीडीएफने कार्यवाह पदाची जबाबदारी टाकल्याचे या निवडीमुळे सिद्ध झाले आहे.
यापुढे नाशिक विभागामध्ये शिक्षक लोकशाही आघाडी टीडीएफचे काम आणखी जोमाने सुरू होऊन शिक्षकांना अनेक सुख सुविधा व त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी गेली 60 -70 वर्ष प्रयत्न करणाऱ्या या संघटनेचे कार्य आणखी जोमाने वाढण्यास मदत होणार असल्याची भावना नाशिक विभागातील शिक्षक नेत्यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे मा. खासदार भास्करराव भगरे,नाशिक विभागाचे अध्यक्ष संजय पवार ,ज्येष्ठ टीडीएफ नेते शिवाजीराजे निरगुडे, बाळासाहेब सूर्यवंशी, कचेश्वर बारसे, रवींद्र मोरे, श्री गोरख तात्या सोनवणे, श्री इ के कांगणे, श्री नानासाहेब देवरे, श्री टी एम डोंगरे, आर. डी. निकम, मधुकर भदाणे, बी आर पाटील, संजय देवरे, गुफरान अन्सारी, रामराव बनकर, अरुण पवार, बाळासाहेब ढोबळे, भाऊसाहेब शिरसाट, एस के टिळे प्रदकुलकर्णी प् हिंगमिरे पी बी., प्रदीप सांगळे, अशोक भदाणे, रियाज शेख, नाना धात्रक, ज्ञानेश्वर कुलकर्णी , संजय देसले, पी. एल. देवरे, एस टी पाटील, मनोज शिरसाठ, घोडके सर, मावळसर, योगेश पाटील, सी डी अहिरे, जीभाऊ शिंदे, हरिभाऊ ठाकरे, ज्ञानेश्वर ठाकरे, अण्णासाहेब काटे, दिगंबर नारायणे, गंगाधर पवार, एस बी देशमुख, कैलास भारती, दत्तात्रेय आदिक, समीर जाधव, सी पी कुशारे, संजय वाघ, रामचंद्र गांगुर्डे, बाळासाहेब देवरे, रोहित गांगुर्डे, संजय गीते, एस के पवार, शशांक मदाने, राजेंद्र निकम, भरत गांगुर्डे, दिनेश देवरे, महेश अहिरे, दिनेश अहिरे, मनोज वाघ, किशोर शिंदे, यशवंत ठोके, सानप बी के. निलेश ठाकूर, निंबा कापडणीस, अशोक देवरे, देवरे एस. पी., भारत भामरे, बाबा खरोटे, शरद गीते, आसिफ शेख, सोमनाथ धात्रक, प्रभाकर कासार, सतीश नाडगौडा, रामनाथ थेटे, सचिन पगार, विलास जाधव, विजया (पाटील) देवरे, अरुणा खैरनार, सरोज देवरे, पप्पू सोनवणे,साहेबराव पवार, नवनाथ निकम, त्र्यंबक मार्कंड, आर के बच्छाव, संजय मगर, दिनेश पवार, वाय आर पवार, सुनील देशमुख, हेमंत देशमुख, राजेश बडोगे, चंद्रशेखर सावंत, प्रदीप पाटील, सचिन शेवाळे, विकास सोनवणे, वीरेंद्र महाले, सुनील देवरे, अशोक सोमवंशी, सचिन सूर्यवंशी, धनंजय चव्हाण, ए. बी देवरे पी जी देवरे, अनिल देवरे, कल्पेश चव्हाण, डी आर सांगळे, मिलिंद टिळे, संजय गाडगे, साहेबराव घुगे, साहेबराव बर्डे, अरविंद पाटील, भगवान गोसावी यांच्यासह कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले..
