“भारताचे माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांना जयंतीनिमित्त अभिवादन”
नाशिक (प्रतिनिधी)
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करत बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमास उपमुख्याध्यापक विजय मापारी, पर्यवेक्षक सूर्यभान जगताप, पर्यवेक्षक शशिकांत दंडगव्हाळ, शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर, जेष्ठ शिक्षक प्रविण जाधव, मंगला मोरे, संजय रणधीर, प्रणाली देशपांडे, पूनम कुमावत, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी विद्यार्थिनी वृषाली झाल्टे, विधी पाटील, लक्षिता मंडळ, उदिता पाटणे, लोक्षनी फेगडे, वृषाली पाटील आणि विद्यार्थी रूपेश क्षीरसागर यांनी पंडित नेहरू यांच्या जीवनकार्याची, बालप्रेमाची तसेच बालदिनाच्या महत्त्वाची माहिती मनोगतपूर्ण शब्दांत सादर केली.
जेष्ठ शिक्षिका पूनम कुमावत यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत नेहरूंच्या विचारांचे मूल्य आणि बालदिनाचा संदेश अधोरेखित केला. कार्यक्रमात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले.
संस्थेचे उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे आणि मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांनी विद्यार्थ्यांना बालदिनाच्या मंगल शुभेच्छा देत उज्ज्वल भविष्याच्या कामना व्यक्त केल्या.
