🌼 सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर – ‘वंदे मातरम’ गीताच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त देशभक्तीचा जल्लोष! 🌼
नाशिक : सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिरात ‘वंदे मातरम’ गीताच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शाळेचा परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. राजेंद्र निकम होते. आपल्या प्रेरणादायी भाषणात त्यांनी ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले.
यानंतर शिक्षक प्रशांत केंदळे व किशोरी शुक्ल यांनी विद्यार्थ्यांना वंदे मातरम गीताचा इतिहास, त्यामागील भावना आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्याचे योगदान याबद्दल सविस्तर माहिती दिली.
शाळेत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या साहित्यिक प्रवासावर आधारित माहितीपट, तसेच ‘वंदे मातरम’ राष्ट्रीय गीताची आकर्षक पोस्टर्स प्रदर्शनी भरविण्यात आली. सात दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या उपक्रमात अशोक शिरोडे (शिक्षक प्रतिनिधी), मनीषा जोशी (दुपार सत्र प्रमुख), प्राजक्ता क्षीरसागर (सांस्कृतिक विभाग प्रमुख), तसेच हर्षल कोठावदे, गणेश गांगोडे, राहुल चव्हाण आणि निलेश चव्हाण या शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
मुख्याध्यापक श्री. राजेंद्र निकम यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमाच्या शेवटी “वंदे मातरम! भारत माता की जय!” या जयघोषांनी शाळा दुमदुमली.
